कलीसिया के लिए परामर्श

100/318

त्यांच्या फळांवरून हे संदेश जाणा

संदेश त्यांच्या फळांवरून ओळखावे. त्यांची शिकवण कोणत्या प्रकारची आहे? त्यांचा परिणाम काय झाला आहे? जे हें सर्व करूं इच्छितात तें या दृष्टांताची माहिती घेऊ शकतात. हें सर्व कायम टिकावे व सैतानाच्या शक्तीविरुद्ध व जे सैतानाच्या कार्याला मदत करतात अशा मानवी हस्तकाविरुद्ध बळकट व्हावे असें देवाला योग्य वाटले. CChMara 146.3

देव आपल्या मंडळीला शिक्षण देत आहे. त्यांच्या चुका दाखवीत आहे व त्यांचा विश्वास बळकट करीत आहे किंवा तो करीत नाही, हें काय देवाचे आहे किंवा त्याचे नाहीं, पण देव सैतानाच्या भागीने काहीं करीत नाहीं. माझे काम.... देवाचा शिक्का दर्शविते अगर शत्रूचा शिक्का दर्शविते ! याबाबतींत अर्धे कांही नाहीं. हें संदेश देवाकडून असावेत किंवा सैतानाकडून असावेत. CChMara 146.4

ज्याअर्थी देव संदेशाच्या आत्म्याद्वारे स्वत: प्रगट झालेला आहे, त्याअर्थी भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ माझ्या समोरून गेला आहे. जी तोंडे मी कधीही पाहिली नाहींत ती मला दाखविण्यांत आली. अनेक वर्षांनी मी त्यांना पाहिलें तेव्हां मी त्यांना ओळखिले. मला माझ्या झोपेतून पूर्वी पाहिलेल्या वस्तूंच्या विस्तृत ज्ञानाने जागे करण्यांत आलें. मी मध्यरात्रीं काहीं पत्रे लिहिली व ती इतर खंडाला पोहचली व आणिबाणीच्या प्रसंगी ती मिळुन त्याकडून देवाच्या कार्याची मोठी हानि टळली. असें कार्य पुष्कळ वर्षेपर्यंत चालले. एका शक्तीने मला धमकावण्यास व मला कल्पना नसलेल्या चुका पदरात घालण्यास भाग पाडले. असें हें कार्य वरून आहे कीं, या जगाचे आहे? CChMara 146.5