कलीसिया के लिए परामर्श
नि:स्वार्या जावेंतोंन दवाला प्रगट करा
मोठ्या प्रमाणांत पापाची आवड धरल्यामुळे तें देवापासून आपल्याला वेगळे करते व अनेक बाधक अशा आत्मिक विकृति निर्माण करते. त्याला स्वार्थीपणा म्हटले आहे. स्वनाकार केल्याशिवाय देवाकडे वळता येणार नाहीं. पण जो देव आपल्याला शक्ति पुरवितो त्याद्वारे आम्ही इतराचे बरे करण्यास जगू शकतो व स्वार्थीपणाची हाव घालवून देऊ शकतो. उपयुक्त व नि:स्वार्थी जीवनासाठी देवाला वाहून दिलेले दर्शविण्यास मूर्तिपूजक देशांत जाण्याची गरज नाहीं. आम्हीं में आमच्या घरांत, मंडळींत व ज्यांच्याशी आमचा संबंध येतो त्यांच्यांत करावे. आपल्या सर्वसाधारण व्यवहारांत स्वला घालवून देऊन त्याला आपल्या ताब्यात आणता येईल. पौल म्हणतो, “मी रोज मरतो.” आपल्या रोजच्या जिण्यांत स्वत:ला रोज मेले पाहिजे व विजयी झाले पाहिजे. इतरांचे बरें करण्यास आम्ही स्वत:ला विसरले पाहिजे. पुष्कळजण इतराबद्दल अप्रीति दाखवितात. आपले कार्य विश्वासाने करण्याऐवजी तें आपली सुखसोय पाहातात. CChMara 141.2
स्वर्गात स्वत:विषयी कोणीही विचार करणार नाहीं व आपल्या सुखसोयी बघणार नाहीं, पण सर्वजण शुद्ध व खर्य प्रीतीने त्याच्या सभोंवती असलेल्या स्वर्गीय व्यक्तींचा आनंद मिळविण्यास झटतील. जर आम्हांला नवीन पृथ्वीवर स्वर्गीय समाजाचा सहवास पाहिजे असेल तर आम्ही स्वर्गीय तत्त्वानुसार येथे चालले पाहिजे. 7 CChMara 141.3
मला असें दाखविण्यांत आलें कीं, आम्हामध्ये अधिक प्रमाणांत स्वत:ची तुलना चालते व न चुकणारा असा खात्रीपुर्वक नमुना असताना आम्ही चुकणारा व मर्त्य मनुष्याचा नमुना असतांना आम्ही चुकणारा व मर्त्य मनुष्यचा नमुना पुढे ठेवतों. आम्ही जगाकडे पाहत स्वत:ची लायकी पटवू नये, किंवा मनुष्याचे मत किंवा सत्य स्वीकारण्यापूर्वी आम्ही कोण होतों याद्वारें स्वत:ची लायकी पटवू नये. पण आजचा आमचा विश्वास व जगांतील आमची स्थिति याची ख्रिस्ताचे अनुयायी झाल्यापासून आम्ही उच्चतेच्या मार्गाला लागलो. त्यावेळेपर्यंतच्या स्थिती तुलना करावी. हीच खरी तुलना होय. याशिवाय इतर गोष्टींत स्वत:ची फसवणूक होईल. जर नैतिक शील व देवाच्या लोकांची आत्मिक स्थिति, ही त्यांना मिळालेला आशीर्वाद, संधि व प्रकाश यांशी जुळती नसतील तर त्यांना तोलले असून तें उणे भरले आहेत असें देवदूत सागतील. 8 CChMara 141.4