शेवट च्या दिवसातील घडामोडी
चमत्कार पवित्र शास्त्रातील जागा घेऊ शकत नाही
चमत्कार करून जे रोग आजार बरे केले जातील त्यांनी पवित्र कार्याचे नाव देण्यात येईल. परंतु तरीही देवाच्या नियमाकडे दुर्लक्ष केले जाईल. देवाच्या आज्ञा चे उल्लंघन चालूच ठेवले जाईल. त्यांनी जरी कोणतेही आणि कोठेही सामर्थ्य असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना देवाचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. देवाच्या नियमांचे उल्लंघन करून असे चमत्कार करतात ती शक्ती त्या महान फसवण्याची सैतानाची असेल. सेलेक्टड मेसेजेस २:५०, ५१ (१८८६). LDEMar 97.1
पवित्र शास्त्र कोणाचीही जागा घेऊन चमत्कार करीत नाही हे स्पष्टच आहे. यासाठी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचा खजिना शोध घेणे गरजेचे आहे. सत्याचा प्रकाश बाजूला ठेवला जाऊ शकत नाही किंवा कोणतेही इतर वचन त्याची जागा घेऊ शकत नाही. वचनाला चिकटून राहा. देवाचे वचन आपल्या मनावर ठसवा यामुळे तुम्ही तारणासाठी खंबीर राहाल.सेलेक्टड मेसेजेस २:४८ (१८९४). LDEMar 97.2
लवकरच आपल्याला शेवटच्या घोर फसवेगिरीला तोंड द्यावे लागणार आहे. विरोधक सैतान त्याची चमत्कारिक कृत्य तो आपल्या डोळ्यादेखत करील. खऱ्या नक्कल तो इतका बेमालूमकरील कि त्यांच्यातील पवित्र शास्त्र वाचून कोणालाही समजणार नाही. प्रत्येक विधान व चमत्कार शास्त्र वचनाची कसोटी लावून खरा आहे किंवा फसवा आहे ते पाहणे गरजेचे होईल. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ५९३. (१९११). LDEMar 97.3