मोक्षमार्ग

8/28

अध्याय ३ रा.—अनुताप

परमेश्‍वरासमोर मनुष्य कसा न्यायी ठरेल ? पापी मनुष्यास कसा शुचिर्भूत करावा ? या प्रश्‍नाचें उत्तर म्हटलें म्हणजे फक्त ख्रिस्तद्वारांच आपला परमेश्‍वराशीं व त्याच्या पवित्रतेशीं संयोग होईल हें होय. परंतु प्रश्‍न हा कीं आपण ख्रिस्ताजवळ यावयाचें तें कोणत्या रीतीनें ? पन्नासाव्या दिवशीं लोकांनीं जसा प्रश्‍न केला व आपल्या पापांबद्दल त्यांची पक्की खात्री होऊन “आम्हीं काय करावें”1 असें त्यांनी मोठा आक्रोश करीत विचारलें त्याप्रमाणें पुष्कळ लोक हाच प्रश्‍न आज विचारीत आहेत. ह्या त्यांच्या प्रश्नास पेत्रसानें “पश्‍चात्ताप करा” असें पहिल्यानें उत्तर दिलें. लवकरच दुसर्‍या वेळीं तो म्हणाला “तुमचीं पापें पूसून टाकली जावीं म्हणून पश्चात्ताप करा व फिरा.”2 WG 18.1

पश्चात्ताप ह्यांत पापांबद्दल दु:ख व त्या पापांपासून परावर्तन या दिन गोष्‍टींचा समावेश होतो. पापाच्या भ्रष्‍टतेविषयीं खात्री झाल्याशिवाय आपण त्याचा त्याग करणार नाहीं. त्यापासून आपण अंत:करणपूर्वक परावृत झाल्याशिवाय आपल्या जीवनक्रमांत खराखुरा फरक पडणार नाहीं. WG 18.2