कलीसिया के लिए परामर्श

265/318

प्रकरण ५३ वें - अंतर्यामाची व जीवनाची शुद्धता

काळजीपूर्वक उत्कृष्ट स्थितींत ठेवण्यासाठी आणि देवाच्या सेवेसाठी व गौरवासाठीं त्यानें तुम्हांस वस्तीस्थान दिलेले आहे. तुमची शरीरे तुमच्या स्वत:ची नाहींत काय? “तुमचे शरीर, तुम्हांमध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांस मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे, हें तुम्हांस ठाऊक नाहीं काय?” “तुम्ही देवाचे मंदिर आहा, आणि तुम्हांमध्ये देवाचा आत्मा बसतो हें तुम्हांस ठाऊक नाहीं काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करितो तर देव त्याचा नाश करील; कारण देवाचे मंदिर पवित्र असतें, तसेच तुम्ही आहा.’’ 1 CChMara 323.1

ह्या भ्रष्टतेच्या युगामध्ये जेव्हां आमचा शत्रु सैतान गर्जणाच्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळंकृत करावे म्हणून इकडे तिकडे वावरत असतो तेव्हां इषारा म्हणून मला माझी वाणी उचावून सांगण्याची आवश्यकता दिसते कीं, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा. मार्क १०:३८.” पुष्कळांच्या अंगीं तेजस्वी बुद्धिमत्ता आहे तें सैतानाच्या सेवेसाठी तिचा दुष्टतेने उपयोग करतात. जगांतील अंध:काराची कामे झुगारून देऊन जे जगापासून अलिप्त झालेले म्हणून म्हणवतात अशाना मी काय बजावून सांगावें ? ज्यांना परमेश्वराने आपल्या नियमशास्त्राचे भांडार करून ठेविले आहे. तथापि त्या ढोगी अजीर-वृक्षाप्रमाणे डबडबलेल्या पाल्यांचाच दिमाख मात्र दाखवितात पण देवाच्या गौरवार्थ फळ कांहीं देत नाहीत, अशांविषयी काय म्हणावे ? त्यांपैकी पुष्कळांच्या मनांत अमगळ विचारसरणी, अपवित्र तर्कबुद्धि, अशुद्ध इच्छा आणि हलकट मनोविकार असतात. अशा झाडावर येणार्‍य फळांचा देवाला तिरस्कार वाटतो. पवित्र व शुद्ध दृतगण अशा लोकांच्या जीवनक्रमाकडे तुच्छतेने बघतात, सैतान मात्र अत्यानंदित होतो. ईश्वराच्या नियमबंधनांचे उल्लघन करून काय लाभ होतो, हें स्त्रीपुरूषांनी पाहून घ्यावें असें मला वाटते. कोणत्याही परिस्थितीमध्ये असल्या उल्लंघन वृत्तीने देवाचा अवमान होतो व मानवासाठी तें शापयुक्त होतें तें कोणत्याही स्वरुपात दिसो व तें कोणाकडूनही होवो, त्याजविषयी आम्हांला असेंच वाटतें. 2 CChMara 323.2

अंत:करणाने शुद्ध तें देवाला पाहतील. प्रत्येक अशुद्ध विवार आत्म्याला कलंकित करितो, नैतिक ज्ञानशक्ति दुर्बल करितो व पवित्र आत्म्याचे संस्कार दिसेनासे करितो. आत्मिक दृष्टि इतकी अंधुक करितो कीं मानवाला देव दिसतच नाहीं. पश्चातप्त पाप्यांना प्रभूनें क्षमा करावी व तो तो करितोच, परंतु जरी क्षमा झालेली असली तरी आत्म्यावर व्रण पडलेले असतातच. आत्मिक सत्याचा ज्याला स्पष्ट उमग पडलेला आहे त्यानें उच्चारांतील व विचारातील अशुद्धता टाळिलीच पाहिजे. 3 CChMara 323.3

पापमय गुंगी विधातक असते असें कित्येकजण कबूल करतील, परंतु आमच्याने मनोविकारावर जय मिळविता येत नाही, अशी सबब तें सांगतात. ख्रिस्ताचे नाम घेणाच्या व्यक्तीने असली कबुली देणे भयंकर आहे. जो कोणी प्रभूचे नाम घेतो, त्यानें अनीतीपासून दूर राहावें.” २ तिमथ्य २:१९. हा असला दुबळेपणा का? याचे कारण एवढेच कीं, सवयीच्याद्वारे विषयवासनेचे नाद इतके बळावलेले असतात कीं उच्च प्रतीच्या शक्तींना तें वरचढ झालेले असतात. तत्त्वज्ञानात पुरुष व स्त्रिया हीं उणीं पडलेली असतात. आत्मिक दृष्ट्या तें मरत आहेत याचे कारण असें कीं, तें आपल्या स्वाभाविक नादफंदाशी इतका काळ खेळत राहिललेले असतात कीं आत्मसयमनाची त्यांची ताकद पार नष्ट झालेली असतें. त्यांच्या स्वभावातील नीच मनोभावनांनी ताबा घेतलेली असतो व ज्या शक्तींचा अधिकार चालवावयास पाहिजे असतो त्या भ्रष्ट भावनांची गुलामगिरी करीत असतात. आत्मा हा नीचातील नीच बंदिस्तींत असतो. विषयवासनेने पवित्र भावनेची भूक मारिलेली असतें आणि आत्मिक प्रगति कोमजून गेलेली असते. 4 CChMara 324.1